Chikhli : जलवाहिनीच्या कामामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – आंद्रा धरणातून (Chikhli) पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणी आणण्यात येणार आहेत. त्यासाठी पिंगळे रोडवरील राधा स्वामी सत्संग न्यास ते चिखली-आकुर्डी परिसरात जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. 5 जुलै ते 5 ऑगस्ट 2022 दरम्यान टप्पाटप्प्याने हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले.

भविष्यातील वाढीव लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा धरणातून पाणी कोटा मंजूर आहे. निघोजे येथे इंद्रायणी नदीतून अशुद्ध पाणी उपसा करुन चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यात येणार आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्र ते देहू आळंदी बीआरटी रस्ता सोनवणे वस्तीपासून स्पाईन रोड येथे महापालिकेच्या अस्तित्वातील जलवाहिनीला नवीन 1100 मिली मीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Jansanvad Sabha : प्रशासनाच्या जनसंवाद सभेकडे नागरिकांची पाठ

पिंगळे रोडवरील राधा स्वामी सत्संग न्यास ते चिखली-आकुर्डी रोड (Chikhli) मार्गे रॉयल ग्रॅनाईंट ते नेवाळे वस्ती कॉर्नर ते गणेश मंदीर नेवाळे मळा ते विनायक रेसिडेन्सी ते व्हिक्टोरीया स्कुल समोरील रस्ता ते साईप्रयाग सोसायटी नंबर 2 ते घरकुल भाजी मंडई रस्ता, साईसदन को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (इमारत क्रमांक सी-20) पर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. 5 जुलै ते 5 ऑगस्ट 2022 दरम्यान टप्प्या-टप्प्याने हे काम करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.