Chimbali News : चिंबळी येथील अनाथ आश्रमातील मुलींना नाश्त्याचे वाटप 

एमपीसीन्यूज  :  सामाजिक कार्यकर्त्या ॲड. जया उभे यांच्या वतीने  मदर तेरेसा सामाजिक विकास संस्थेच्या सामाजिक संकुल आश्रम चिंबळी येथील मुलींना  नाश्ता तसेच चिखली येथील चंद्रभागा गोशाळेतील गाईंच्या चाऱ्यासाठी देणगी देण्यात आली. 

ॲड.  उभे या दरवर्षीं त्यांचा वाढदिवस अनाथ मुलींसोबत साजरा करीत असतात.  वाढदिवसानिमित्त तसेच इतर वेळीसुद्धा त्या  अनाथ  मुलांना साहित्य भेट देणे,  वह्या पुस्तके देण्याचे कार्य करत असतात.  आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने  तसेच  अनाथ मुलांनाही  जीवनात आनंदाचे क्षण  अनुभवण्याची संधी मिळाली या हेतूने त्यांनी  चिंबळी येथील सामाजिक संकुल आश्रमातील  मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

त्याचबरोबर  चंद्रभागा गोशाळेतील  गाईंना चारा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी  गोशाळेचे उपाध्यक्ष व फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्याकडे देणगी सुपूर्द केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.