Dehuroad : वाढदिवसाचा खर्च टाळून अक्षय वाघमारे करणार अनाथ मुलींचा सर्व खर्च

एमपीसी न्यूज – देहूरोड शहराचे भीम आर्मीचे शहराध्यक्ष अक्षय वाघमारे यांनी आपल्या वाढदिवसाला होणार अनावश्यक खर्च टाळून त्यांनी देहूरोड संतुष्टी बाल विकास आणि स्त्री आधार सेवा केंद्र या अनाथलायत अनाथ मुलासोबत सहपरिवार वाढदिवस साजरा केला.

त्याच अनाथलयातील दोन महिन्याच्या अनाथ मुलीचा सर्व खर्च हे अक्षय वाघमारे करणार आहेत. तसेच त्या अनाथ मुलीचे नामकरण अनन्या असे केले आहे.

  • या वाढदिवसाला अनाथलयातील संचालिका रिना कदम, सुनील शेळके, युवा मंचचे अतुल मराठे, शिवसेनेचे जस्विदर बडीलान, संदीप बालघरे, विकी जाधव, अनिकेत वाघमारे, रमेश पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.