Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात 18 पोलीस निरीक्षकांची बदली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलातील 294 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 18 पोलीस निरीक्षक आले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमधून चार पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत.

विहित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 294 निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्या शनिवारी (दि. 14) झाल्या आहेत. या सार्वत्रिक बदल्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत सारंगल यांनी दिले आहेत.

यावर्षीच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या चार पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. तर पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, जालना, अकोला आदी शहरात विविध विभागात कार्यरत असलेले 18 पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत.

शहरातून बदली झालेले पोलीस निरीक्षक (बदलीचे ठिकाण) ः रंगनाथ बापू उंडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), अजय हनुमंत भोसले (नवी मुंबई), सुनील जयवंत पिंजण (गुन्हे अन्वेषण विभाग).

शहरात बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक (बदलून आलेले ठिकाण) ः रावसाहेब बापूराव जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), विजया विलास करांदे (पुणे शहर), सत्यवान बाजीराव माने (नागपूर शहर), शंकर रामभाऊ दामसे (पुणे शहर), मनोज बाबुराव खंडाळे (लोहमार्ग पुणे), दिलीप पांडुरंग शिंदे (पुणे शहर), मधुकर माणिकराव सावंत (औरंगाबाद शहर), दीपाली दत्तात्रय धाडगे (पुणे शहर), रामचंद्र नारायण घाडगे (नवी मुंबई), मच्छिंद्र रमाकांत पंडित (पुणे शहर), वर्षाराणी जीवनधर पाटील (वर्षाराणी रावसाहेब चव्हाण) (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), दीपक रामदास साळुंके (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), किशोर ढोमण पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), नितीन मयप्पा लांडगे (गुन्हे अन्वेषण विभाग), रमेश जानबा पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग), सुनील निवृत्ती तांबे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), रुपाली प्रल्हाद बोबडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), राजेंद्र पांडुरंग बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.