Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 100 जणांवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणा-या 100 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 6) कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात तीन हजार 810 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यानंतर देखील ही कारवाई सुरूच आहे.

रविवारी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात 100 लोकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. त्यांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (20), भोसरी (0), पिंपरी (12), चिंचवड (5), निगडी (5), आळंदी (0), चाकण (0), दिघी (२), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (10), वाकड (19), हिंजवडी (6), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (14), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.