Chinchwad : हॉटेलसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून महागडे घड्याळ पळवले!

एमपीसी न्यूज – हॉटेलसमोर दुचाकी पार्क करून हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाची दुचाकी उचकटून त्यातून महागडे घड्याळ चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) सायंकाळी सहा ते सात या कालावधीत शाहूनगर, चिंचवड येथे साई हॉटेलसमोर घडला.

रोहित ज्ञानेश्वर गरड (वय 25, रा. चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित त्यांच्या मित्रांसोबत शाहूनगर येथील साई हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गेले. दरम्यान, रोहित यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जी टी 0188) हॉटेलच्या बाहेर पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उचकटून त्यातून अ‍ॅपल कंपनीचे महागडे घड्याळ चोरून नेले. रोहित नाशता करून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.