Chinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

Chinchwad: Beating a young man out of prejudice

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दोन तरुणांना कोयत्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी मोहननगर चिंचवड येथे घडली.

 

आकाश शिवाजी सलगर (वय 27, रा. मोहननगर, चिंचवड) आणि आशिष गोरख अशी जखमी तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राठोड (वय 25), संतोष उर्फ मलींगा राठोड (वय 26), शुभम राठोड (वय 22, सर्व रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची जखमी आशिष यांच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाली होती. या भांडणाच्या रागातून शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास आरोपीने आशिष यांना कोयत्याने मारून जखमी केले. तसेच आशिष यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.