Chinchwad: आता भाजपमधील प्रवेश ‘क्लोज’ – सुरेश हाळवणकर

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. इंदापूर मतदारसंघात यात्रेचे जोरदार स्वागत झाले पाहिजे. तीन हजार कार्यकर्ते रॅलीला आल्यास काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करायला विलंब करायला नको, असे वाटले पाहिजे. त्यावर इंदापूरचे कार्यकर्ते शांत होताच चिंता करु नका तुमच्या भावनेचा विचार केला जाईल. आता जवळ-जवळ भाजपमधील प्रवेश ‘क्लोज’ केले असल्याचे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी आज (सोमवारी) सांगितले.

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे आज पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हाळवणकर बोलत होते.

  • ईडी, एसबीची चौकशी सुरू असलेल्यांना भाजपात घेतले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचे सांगत सुरेश हाळवणकर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस 1 ऑगस्टपासून राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेचे शक्ती केंद्रप्रमुखांनी जोरदार स्वागत करावे. इंदापूर मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागत रॅलीला तीन हजार कार्यकर्ते आल्यास हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करायला विलंब करायला नको असे वाटले पाहिजे. त्यावर इंदापूरचे शक्ती-केंद्र प्रमुख शांत होताच. परुंतु, ते नेते आता ‘आउटडेटेड’ झाले आहेत. त्यामुळे त्यांना घेऊ नका अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तुमच्या भावनेचा विचार केला जाईल. आता जवळ-जवळ प्रवेश ‘क्लोज’ केले आहेत, असे ते म्हणाले.
_MPC_DIR_MPU_II

हाळवणकर पुढे म्हणाले, विरोधक मनामध्येच हरले आहेत. त्यामुळे रणांगणात ते टिकणार नाहीत. निवडून येऊ अशी मानसिकता विरोधकांडे राहिली नाही. संघटनेकडे लक्ष्य दिले नाही, म्हणून त्यांची आज वाताहत झाली आहे. त्यामुळे संघटनेची नाळ जनतेशी जोडली पाहिजे. आपण ती नाळ तुटून देता कामा नये. घरावर भाजपचा झेंडा लावा. प्रत्येकाच्या घरावर कमळ चिन्ह काढावे. त्याचा चांगला उपयोग होतो. त्रिपुरामध्ये वातावरण निर्मिती करण्यात त्याचा उपयोग झाला. त्यामुळे डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरावर झेंडा लावा. शक्ती केंद्रप्रमुखांनी 25 घरापर्यंत जावून झेंडे लावायचे आहेत. झेंडे आणि काठी पक्ष देणार आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख कमी असल्याने नाराजी व्यक्त करत बारामती जिंकायचे आणि सेनापतीच कमी आहेत. कसे व्हायचे आहे असेही ते म्हणाले.

  • त्यानंतर लक्ष्मण जगताप म्हणाले, राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड मधील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. अवैध बांधकामाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळेच लोकसभेला मावळ मतदारसंघातील मित्र पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. पक्षाच्या पदाधिका-यांनी गत काळात चांगले काम केले. यापुढेही चांगले काम करण्याचे सर्वांनी प्रयत्न करावेत.

सचिन पटवर्धन यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची माहिती दिली. सदस्य नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.