Chinchwad : साईबाबा सेल्सच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या काळभोरनगर येथील साईबाबा सेल्स प्रा. लि. च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त साईबाबा टीव्हीएस शोरुम येथे आज (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
साईबाबा सेल्सच्या रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे. आदित्य बिर्ला रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. साईबाबा सेल्सचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा, असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृपालशेठ गेहानी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.