Chinchwad Bye Election : ‘संपेल शास्तीकर, बटन शिट्टीचं दाबाल जर’, राहुल कलाटे यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  ‘संपेल शास्तीकर, बटन शिट्टीचं दाबाल जर’ असे विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत ‘ना कुठला पक्ष, ना कुठला नेता, माझा आधार फक्त मायबाप जनता’, अशी साद चिंचवड विधानसभा (Chinchwad Bye Election) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे मतदारांना घालत आहेत. कलाटे यांनी रावेत, पुनावळे, रहाटणी येथे मतदारांच्या गाठीभेटी तसेच बैठका घेतल्या. पिंपळे निलख परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

चिंचवड विधानसभेची निवडणूक राहुल कलाटे शिट्टी चिन्हावर लढत आहेत. कलाटे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. दिवसेंदिवस कलाटे यांना मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. कलाटे यांची प्रचारगीते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ”चिंचवडमध्ये आम्ही शिट्टी निवडणार, राहुलदादांना आमदार करणार”, ”वारसा आहे त्यांचा समाजसेवेचा, विकासाचे त्यांनाच आहे व्हिजन”…”आले आले राहुल कलाटे, शिट्टीचा आता नाद घुमे”, ”आले राहुलदादा त्यांचा बोलबाला, युवा आमदार विधानसभेत जाणार”,

Chinchwad Bye Election : निवडणूक कर्मचा-यांना प्रशिक्षण

”दररोज पाणी मिळेल. वाहतूक कोंडी सुटेल. विकास गंगा आता येईल दारी, आले आले राहुलदादा आता जोमात, शिट्टी समोरचे बटन दाबा झटक्यात”… ”विकास कामे बघून सारे होतील, दंग युवा आमदार सोडवेल प्रश्न, जनहितासाठी राहुलदादा आहेत हट्टी, निवडवायचे त्यांचे चिन्ह शिट्टी, 26 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा राहुलदादा आमदार होणार ओ….’एकजुटीने आता लढायचे, चिंचवडचे हित आता पहायचे..राहुलदादाला आमदार करायचे”, ”शिट्टीसमोरचे बटन दाबायचे…युवा नेते आहे, खास विकासाचा त्यांना ध्यास…समाजसेवेचा वारसा कलाटेंच्या कामाचा ठसा…

दादा म्हणजे आत्मविश्वास…जनहिताची त्यांना आस….पिण्यास मिळेल पाणी, सुटेल वाहतूक कोंडी…कच-याचे करु व्यवस्थापन ऑक्सीजन पार्कचे वचन…शिक्षण मिळेल दर्जेदार, युवकांना स्वयंरोजगार…चिंचवडची निवडणूक निश्चितच वेगळी आहे. प्राप्त परिस्थितीत राहुल कलाटे हेच जनतेच्या मनातील  (Chinchwad Bye Election) आमदार हीच लोकांची भावना आहे. काम करणारा माणूस म्हणजे राहुल कलाटे, जे बोलले ते करणार अशी ज्यांची ख्याती…राहुल कलाटेच करतील चिंचवडची प्रगती…ही प्रचार गीते मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.