Wakad Crime News : घरफोडी करून सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज –  वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून (Wakad Crime News) सव्वासहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 38  वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Bye Election : ‘संपेल शास्तीकर, बटन शिट्टीचा दाबाल जर’, राहुल कलाटे यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे घर गुरुवारी (दि. 16 ) दुपारी अडीच ते शुक्रवारी (दि. 17 ) सकाळी सव्वाअकरा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पाच लाख 68 हजारांचे 152 ग्रॅम सोन्याचे आणि 20 हजारांचे चांदीचे असे एकूण सहा लाख 28  हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. (Wakad Crime News) वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.