Chinchwad : वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – व्यायाम करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावले. ही घटना श्रीधरनगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 14) सायंकाळी घडली.

सीमा सुधाकर दिक्षित (वय 60, रा. नवकार आर्किड, श्रीधरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी सीमा चालण्याचा व्यायाम करण्यासाठी परिसरात फेरफटका मारत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.