Chinchwad : थेरगाव सोशल फाउंडेशनकडून पवना नदीत स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने पवना नदीत केजुदेवी बंधा-यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये झाडाची खोडे, लाकडी मूर्ती आणि जलपर्णीमुळे दुर्गंधी पसरलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या ‘स्वच्छता, सुंदरता, जागरूकता’ या मोहिमेअंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचा हा 79 वा आठवडा आहे.

मागील एक आठवड्यापासून थेरगाव येथील केजुदेवी बंधा-यात दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारी थेरगाव सोशल फाउंडेशनकडे येत होत्या. फाउंडेशनच्या सदस्यांनी आज (रविवारी) बंधा-याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत असे निदर्शनास आले की, ‘पावसात वाहून आलेली मोठी खोडे, मूर्तींचे सांगाडे बंधा-याच्या मो-यांवर अडकली आहेत. त्यालाच लागून जलपर्णी वाढत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे.’

थेरगाव सोशल फाऊंडनेशनच्या सदस्यांनी पवना नदी स्वच्छता मोहीम राबवली. बंधा-यात अडकलेली खोडे, मूर्ती आणि जलपर्णी बाजूला काढली. जलपर्णी वाढल्यामुळे एक बेट नदीमध्ये तयार झाले होते. ते बेट सदस्यांनी उध्वस्त करून दिले. घाण अडकल्यामुळे बंधा-यांचे काही दरवाजे बंद झाले होते. या मोहिमेत स्वच्छता करून बंद झालेले दरवाजे पूर्ववत सुरु करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.