Chinchwad Crime News : दिघी, सांगवी, चिखलीतून तीन दुचाकी चोरीला

0

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी दिघी, सांगवी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरून नेल्याच्या गुन्ह्याची शुक्रवारी (दि. 13) नोंद झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन चोरीच्या पहिल्या घटनेत प्रिन्स मॅथ्यूज वर्गीज (वय 28, रा. गायत्री पार्क, आळंदी रोड, विश्रांतवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वर्गीस यांची 10 हजार रुपये किंमतीची (एम एच 12 / ए एन 8481) ही दुचाकी 25 ऑक्‍टोबर रोजी चऱ्होली गाव येथील प्राइड सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

वाहन चोरीच्या दुसऱ्या घटनेत प्रशांत भिकन सोनावणे (वय 31, रा. गंगानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनावणे यांची 25 हजार रुपये किंमतीची (एम एच 14 / ए जी 0296) ही दुचाकी 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.40 वाजताच्या दरम्यान चोरट्याने राहत्या घराजवळील सार्वजनिक रोडवरून चोरून नेली.

वाहन चोरीच्या तिसऱ्या घटनेत प्रणव बाळासाहेब सायकर (वय 32, रा. कोयनानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सायकर यांची 80 हजार रुपये किंमतीची बुलेट अज्ञात चोरट्याने शुक्रवारी सायंकाळी पावणे सात ते 11 वाजताच्या दरम्यान कस्तुरी चौक, चिखली येथून चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III