Chinchwad Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीची इच्छा नसताना पतीने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार (Chinchwad Crime) केला. तसेच लग्नात मानपान केला नाही, सोनेनाणे दिले नाही असे बोलून शारिरीक, मानसिक छळ केला. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 18 जुलै 2021 ते 9 जून 2022 दरम्यान वाल्हेकरवाडी ते पुरंदर येथे घडला.  

याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद यांच्या विरोधात कलम 377, 498 (अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad Crime News: चहा पिण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तरुणीचा विनयभंग

पती, सासू, सासरे व नणंद यांनी (Chinchwad Crime) संगणमत करुन ‘तुझ्या आईने लग्नात मानपान केला नाही. सोनेनाणे दिले नाही’ असे म्हणत अपमान करत फिर्यादीचा मानसिक छळ केला. इच्छा नसताना पतीने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केले. त्याला नकार दिला असता शिवीगाळ व मारहाण केली. सासऱ्यांनी फिर्यादीच्या पतीला फिर्यादीबद्दल उलटसुलट सांगून त्याला भडकावून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.