Dehuroad Crime News: चहा पिण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आलेल्या तरुणीला ‘चहा पिण्याच्या बहाण्याने’ घरी नेत विनयभंग केला. ‘मला तू खूप आवडते’ म्हणत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी दीडच्या सुमारास परंडवाल चौक, देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश बापुराव पाटील (वय 26, रा. परंडवाल चौक, देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Saurav Mahakal : सौरव महाकालने सांगितला सलमान खान धमकी प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन

फिर्यादी तरुणी गुरुवारी म्हाळुंगे एमआयडीसीतील कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्याकरिता गेली होती. आरोपी महेश फिर्यादी तरुणीच्या ओळखीचा आहे. इंटरव्ह्यूव देऊन तरुणी आरोपी महेश याच्या दुचाकीवरुन घरी जात होत्या.

आरोपी महेश याने चहा पिण्याच्या बहाण्याने फिर्यादीला तरुणीला घरी नेले. घरी गेल्यावर ‘मला तू खूप आवडते’ म्हणत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.