Saurav Mahakal : सौरव महाकालने सांगितला सलमान खान धमकी प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सौरव महाकाल उर्फ सिद्धेश हिरामण कांबळे (Saurav Mahakal) याच्याकडे मुंबई क्राईम ब्रँचने काल चौकशी केली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. त्यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. या चौकशीत सौरव महाकाल याने धक्कादायक खुलासा केला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सलमान खान त्याला धमकी दिल्यानंतर बॉलिवूड जगतात भीती निर्माण करण्याचा उद्देश होता. सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून खंडणी वसूल करता येईल असं महाकालने पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाकाल याने दिलेल्या कबुलीनुसार सिद्धू मूसेवाला हत्येनंतर सलमान खानला धमकी देण्यामागे बॉलीवूड विश्वातून खंडणी वसूल करण्याचा हेतू होता.

Pimpri News : महापालिका माध्यमिक शाळांसाठी 140 शिक्षकांची मानधनावर करणार नेमणूक

सौरव महाकालने (Saurav Mahakal) दिलेल्या खुलाशानुसार धमकीच्या पत्रातून बॉलिवुडमध्ये भीती निर्माण करण्याचा इरादा होता. खंडणीची रक्कम मिळाली असती तर पुढची रणनीती आखली गेली असती. या सर्वांचा मास्टरमाईंड हनुमानगडचा विक्रम बरार होता. विक्रम बरार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आहे. त्यानेच बोलून खंडणी उकळण्याचा प्लॅन केल्याचा खुलासा महाकाल यांनी केला.

सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षारक्षकाला एक पत्र सापडलं होतं. ज्या ठिकाणी सलमान आणि सलीम खान मॉर्निंग वॉकला जातात त्याच ठिकाणी हे पत्र सापडलं होतं. या पत्रात सलमान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉक केल्यानंतर सलमान खान विश्रांतीसाठी थांबतो नेमकं त्याच बेंचवर धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं. ज्यात तुमचाही सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी देण्यात आली होती. दरम्यान 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेतला असता सलमान खान धमकी प्रकरणाचा सुद्धा खुलासा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.