Chinchwad : सिंहगड एक्सप्रेस लेट झाल्याने चाकरमान्यांना बसतोय लेटमार्क

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून सिंहगड एक्सप्रेस (11010) रेल्वे उशिराने धावत (Chinchwad) आहे. दररोज लेट होणाऱ्या रेल्वेमुळे दररोज पुणे-मुंबई प्रवास करणारे चाकरमानी कार्यालयात वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना लेटमार्क लागत असून त्याचा आर्थिक फटका चाकरमान्यांना बसत आहे. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेस रेल्वेचे परिचालन वेळेत व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

सिंहगड एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 06.05 वाजता सुटते. पुढे ती खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कल्याण जंक्शन, दादर येथे थांबे घेत सकाळी 09.53 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचते. सिंहगड एक्सप्रेस (11001) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 05.50 वाजता सुटते. ही गाडी रात्री 09.50 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचते.

Maval : मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभूळकर

पुणे-मुंबई दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिंहगड एक्सप्रेस (Chinchwad) फायद्याची आहे. पुण्याहून मुंबईला जाणारी सकाळी पहिली रेल्वे सिंहगड एक्सप्रेस आहे. त्यामुळे या गाडीला नेहमी गर्दी असते. पुणे शहर परिसरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद या गाडीला असतो. सकाळी पुणे-मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस मागील सुमारे दीड महिन्यापासून उशिराने धावत आहे.

सिंहगड एक्सप्रेसचा वेग मंदावल्याने दररोज प्रवास करणा-या नोकरदार वर्गाला मोठा फटका बसत आहे. सततच्या लेट मार्कमुळे रजा कापणे, वेतन कापणे, कामावर हजर करून न घेणे अशा समस्यांचा सामना नोकरदार वर्गाला करावा लागत आहे.

रेल्वे प्रवासी दीपक शेगर म्हणाले, “सिंहगड एक्सप्रेस ही गाडी दररोज 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते. लोणावळा पर्यंत सुमारे 15 ते 20 मिनिट उशीर होतो. पुढे कर्जत स्थानकाच्या अलीकडे सिंहगड एक्सप्रेसला थांबवून खोपोली लोकलला सोडले जाते. आधीच उशिराने धावणाऱ्या सिंहगडला यामुळे आणखी 15 ते 20 मिनिट उशीर होतो. हा विलंब सीएसएमटी स्थानकापर्यंत अर्धा तास एवढा होतो. रेल्वे प्रशासनाने याची दखल (Chinchwad) घ्यावी.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.