Chinchwad: पक्षाच्या भूमिकेमुळेच माझा अर्ज बाद -प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एबी फॉर्मसाठी मी नेत्यांच्या दोन दिवस संपर्कात होतो. पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. नेत्यांमुळेच अर्ज बाद झाल्याचा आरोप प्रशांत शितोळे यांनी केला. पक्षाने कोणत्या प्रकारच्या अंधारात ठेवून ही भूमिका घेतली हे कळले नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरीत आज (शनिवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शितोळे म्हणाले, मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यानुसार मी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाचा एबी फॉर्म असेल या आशेने मी अर्ज भरला होता. परंतु, प्रयत्न करुनही शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही. पक्षाने कोणत्या प्रकारच्या अंधारात ठेवून ही भूमिका घेतली हे कळले नाही. हा प्रकार का आणि कसा घडला? हे सांगता येत नाही. मात्र, हा प्रकार अन्यायकारक आहे.

पिंपरीत दोघांना एबी फॉर्म दिला. भोसरीत एबी फॉर्म घेण्यासाठी मागे लागले होते. तर, चिंचवडमध्ये मी तयार असताना पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असेही शितोळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.