Chinchwad News : चिंचवडचा रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद

एमपीसी न्यूज  – महावीर चौकातून चिंचवड गावाकडे (Chinchwad News) जाणारा रेल्वे उड्डाणपूल देखील बंद करण्यात येणार आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पूल आज (रविवार) पासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

या पुलावरून अवजड वाहन चालकांनी या मार्गावरून वाहने न नेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सतीश माने यांनी आदेश दिले आहेत.

Melodies of Asha Bhosale Quiz 4 Result : ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’ प्रश्नमंजुषा स्पर्धेतील चौथ्या दिवसाचे ‘हे’ आहेत विजेते!

महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा जुना रेल्वे पूल हा कमकुवत झाला असल्याचे त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यामध्ये पीएमपीएमएल बसचा देखील समावेश आहे.(Chinchwad News) या मार्गावरील जड, अवजड वाहने, पीएमपीएमएल बसेस महावीर चौकातून खंडोबा माळ-भक्ती शक्ती येथून बिजलीनगर-रिव्हर व्ह्यू मार्गे इच्छित स्थळी जातील.

दरम्यान, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौकातून स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूलावरून लिंकरोड चिंचवडकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी येथून चिंचवडला जाण्यासाठी रिव्हर रोड मार्गे जावे लागत आहे. (Chinchwad news) आता महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल देखील बंद केल्याने पिंपरीतून चिंचवड गावात जाण्यासाठी थेट भक्ती शक्ती चौकातून वळसा मारून जावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.