Chinchwad : गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार – मसूद पटेल

एमपीसी न्यूज – गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार (Chinchwad) आहे, असे मत ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (दि. 26) चिंचवडगाव येथे समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सतीशसिंह मालवे आणि नीलेश शेंबेकर यांच्या गझलांचे सादरीकरण आणि त्यावर ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांनी केलेले भाष्य असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, प्रा. दिनेश भोसले, प्रशांत पोरे, हेमंत जोशी, संदीप जाधव, समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अरविंद दोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सतीशसिंह मालवे आणि नीलेश शेंबेकर यांनी सादर केलेल्या गझलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली.

रघुनाथ पाटील म्हणाले की, “आयुष्य समर्पित करून सुरेश भट यांनी मराठीत गझल रुजवली. त्यामुळे मराठी गझलकारांच्या (Chinchwad) सशक्त पिढ्या निर्माण झाल्या आहेत. “गावाकडे भले माझे शिवार नाही…” ही मालवे यांची रचना रानकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेची आठवण करून देते.‌

Alandi : आळंदीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त ग्रंथदिंडी

‘माणसे’ ही गझल माणसातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन घडवते; तर ‘पक्षी’ ही रचना प्रत्येक कष्टकरी बापाला मानवंदना देते. “या नभाचे त्या नभाशी काही न देणे घेणे…” ही शेंबेकर यांची अतिशय तरल अभिव्यक्ती ते नव्या पिढीतील एक दमदार गझलकार आहेत, या गोष्टीचा प्रत्यय देणारी आहे.

समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र भागवत, सुप्रिया लिमये यांनी संयोजनात सहकार्य केले. समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.