Chinchwad : यंदाची राखी इस्रो शास्त्रज्ञ आणि सीमेवरील जवानांसाठी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या (Chinchwad) युवती आघाडीच्या वतीने इस्रो शास्त्रज्ञ आणि सीमेवरील जवानांसाठी सहाशे पेक्षा अधिक राख्या पाठवण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी या राख्या मान्यवरांच्या हातात बांधल्या जातील.

आपला भारत देश सुरक्षित रहावा यासाठी घरापासून हजारो किलोमीटर लांब, सर्व सण-समारंभ, नात्यांकडे पाठ फिरवून, निधड्या छातीने, अभिमानाने देशांच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी तसेच चांद्रयान-3 हे यान अंतरिक्षात पाठवून जगभरात गर्वाने आपली मान उंचावणाऱ्या इस्रो शास्त्रज्ञांना राख्या पाठवण्यात आल्या.

सामाजिक संघटनेची जाणीव ठेवताना, राष्ट्र प्रथम या भावनेतून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांच्या नेतृत्वाखाली युवती आघाडी अध्यक्षा सरस्वती जोशी यांनी ही अभिनव कल्पना मांडली. ज्याला सर्व पदाधिकारी यांनी दुजोरा दिला.

Chinchwad : गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार – मसूद पटेल

जिल्ह्याच्या प्रत्येक भागातून सभासदांनी राख्या आणून दिल्या. ज्या एकत्रितपणे इस्रो (Chinchwad) मुख्यालय, सीमेवर योग्य नियोजनाने पाठवण्यात आल्या. देशाअंतर्गत प्रश्नांची योग्य दखल घेत असताना, देशाच्या अस्मितेच्या प्रती आपली सदभावना युवती आघाडीने राख्या पाठवून केली असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.