Chinchwad : सरकार खोटे काम करत नाही, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – राज्यात यापूर्वी सिंचनावर 70  हजार कोटी रुपये (Chinchwad) खर्च झाले. तरी सिंचन झाले नव्हते. आमच्या सरकारने सिंचन योजना वाढविली असून  आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप, दाखले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे ऐकलेच पाहिजे. (Chinchwad) लाखो लोकांतून ते निवडून आलेले असतात. अधिकाऱ्यांनी इगो ठेवू नये. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एका रथाचे दोन चाके आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सरकार बंद होते. लॉकडाऊन लावले जात होते.

घाबरून घरी बसविले जात होते. आम्ही सर्व उघडले.  सण मोठ्या उत्साहात साजरे केले. लोक बाहेर पडल्याने कोरोना पळून गेला.

Chakan : चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महावितरणकडून ग्वाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.