Chinchwad: ‘गटारी’च्या पार्श्वभूमीवर मटण, चिकन खरेदीसाठी तोबा गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ

Chinchwad: huge crowd to buy mutton, chicken, no one maintain physical distance कोरोना संकट संपल्यासारखे लोक वावरताना दिसत होते. दुकानासमोर झालेल्या गर्दीत नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नव्हते.

एमपीसी न्यूज – लॅाकडाऊनमध्ये शिथिलता देताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली आहे. उद्यापासून श्रावणी सोमवार सुरवात होत आहे. त्यामुळे मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी दुकांनासमोर एकच गर्दी केली. मात्र, सूट मिळताच नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे दिसून आले.

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी आठ वाजल्यापासून किराणा, भाजीपाला, मटण, चिकन ही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.

पाच दिवसांपासून घरात अडकलेल्या नागरिकांनी सूट मिळताच बाजारात खरेदीसाठी एकाच गर्दी केली होती. दरम्यान, कोरोना संकट संपल्यासारखे लोक वावरताना दिसत होते. दुकानासमोर झालेल्या गर्दीत नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नव्हते. तर काहीजण तर विना मास्कचे फिरताना दिसून आले.

आज गटारी अमावसेच्या पार्श्वभूमीवर मटण, चिकन खरेदीसाठी दुकानसमोर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, रहाटणी, काळेवाडी परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळली होती.

नागरिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीच काळजी घेताना दिसत नाहीत. यातून संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार दिवसात 2400 कोरोना रुग्ण !

पिंपरी-चिंचवडमध्ये 14 जुलै मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाऊनच्या मागील चार दिवसांत शहरात तब्बल 2400 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

तर मागील आठ दिवसांत जवळपास 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली तरी नागरिकांनी अधिक सतर्क राहून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

संसर्गापासून बचावासाठी मास्क परिधान करणे, सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच वेळोवेळी हात सॅनिटायझ करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.