Lonavala: तुंगार्ली, पांगोळीत झालेल्या घरफोड्या उघडकीस, तीन अल्पवयीन मुलांनी केली चोरी

Lonavala: Three minors burglarized in Tungarli, pangoli लॉकडाऊनच्या काळात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल झाले होते.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन काळात तुंगार्ली व पांगोळी भागात दोन बंगल्यांमध्ये घरफोडी करत साहित्याची चोरी झाली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता लोणावळा शहर पोलिसांना त्याच भागात राहणारी तीन अल्पवयीन मुले मिळून आली आहे. त्यांच्याकडून चोरी झालेला 32 हजाराचा मुद्देमाल शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा शोध सुरू असताना गुन्हे विभागाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल अजिज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, पवन कराड, यांनी पांगोळी भागातील तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेला एलईडी टीव्ही, 3 इन्व्हर्टर बॅटर्‍या, गॅस शेगडी, झुंबर हा मुद्देमाल देखील पोलिसांच्या स्वाधीन केला. तीनही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.