Pimpri: लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल- आयुक्त हर्डीकर

Pimpri: Rs 1 crore fine recovered from lockdown violators: Commissioner shravan Hardikar ही रेकॉर्डब्रेक दंड वसुली आहे. पण, दंड वसुली करणे आमचे उद्दिष्ट नाही.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून लॉकाडऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 कोटी रुपयांच्यावर दंड वसूल केला आहे. ही ‘रेकॉर्डब्रेक’ दंडवसुली असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 जुलैपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यातील पाच दिवस पूर्ण झाले आहेत. आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने, भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी आज (रविवारी) फेसबुक लाईव्हद्वारे शहरवासियांशी संवाद साधला.

लॉकडाऊनमध्ये काही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. पालिका, पोलीस प्रशासनाने गेल्या पाच दिवसांत विविध नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून तब्बल 1 कोटीच्यावर दंड वसूल केला आहे. ही रेकॉर्डब्रेक दंड वसुली आहे. पण, दंड वसुली करणे आमचे उद्दिष्ट नाही.

दुस-या बाजूला जे कायद्याचे पालन करणार नाहीत. इतरांच्या आरोग्याची निगा राखणार नाहीत. आरोग्य धोक्यात आणतील. त्या सगळ्यांवर कडक कारवाई करावी लागली. तर, निश्चितपणे पालिका, पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे, असा इशाराही आयुक्त हर्डीकर यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.