Ambegaon: सामुदायिक वृक्षारोपण अन संवर्धन महाअभियान

Ambegaon: Community Plantation and Conservation Campaign प्रातिनिधिक रूपात लोणी गावात रांगोळ्या काढून व वृक्षाची पूजा करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशन पिंपरी-चिंचवड पुणे, माजी विद्यार्थी प्रबोधिनी व आठ ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये लोणी, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, रानमळा, वडगावपीर, मांदळवाडी व शिरदाळे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून निसर्गाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी, प्रदूषित वातावरणात सुधारणा करून वसुंधरा हिरवीगार करण्यासाठी शनिवारी सामुदायिकरीत्या एकाचवेळी त्या-त्या गावांत वृक्षारोपण करण्यात आले.

प्रातिनिधिक रूपात लोणी गावात रांगोळ्या काढून व वृक्षाची पूजा करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. बाकी गावांमध्ये स्थानिक सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य व गावकऱ्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आणि सामाजिक अंतर ठेवून वृक्षारोपण केले व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली.

वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना संरक्षक जाळ्या (ट्री- गार्ड) लावण्यात आल्या. यासाठी मोलाचे सहकार्य पुनीत बालन फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायर आणि त्यांच्या कार्यकर्तेसह तसेच इतर भूगोल फाउंडेशन आणि विद्यार्थी प्रबोधिनी यांनी ट्री-गार्डसाठी विशेष सहाय्य करून ते उपलब्ध करून दिले.

प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आलो. लोणीत १०००, धामणीत ३५०, खडकवाडीत २००, रानमळा ३००, वाळुंजनगर ३००, वडगाव ५००, मांदळेवाडी ५००,शिरदाळे २०० असे एकूण ३१०० वृक्ष त्या-त्या गावात रोपण करण्यात आले.

गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड म्हणाले, आपल्या वसुंधरेने आणि निसर्गाने आपणास दिलेल्या या अमूल्य देणगीच्या ठेव्याने सर्व मानवजात आणि पशु- पक्षी आपल्या जीवनाचा आनंद घेत आहेत. तो असाच टिकवून ठेवण्यासाठी आपण निसर्गाप्रती आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून आपण पुढील पाच वर्ष वृक्षारोपण करून पंचक्रोशीतील आपला सर्व परिसर हरित करणार असल्याची सर्वांनी जबाबदारी घेणे ही काळाची गरज आहे.

ही जबाबदारी आपण सामुदायिकरित्या पार पाडू या. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास व दुष्काळ निवारण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल वृक्षारोपण एका अर्थाने ही समाजसेवा करता करता आपल्या हातून देश सेवा ही घडणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी टी. के चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के खराडे, भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळुंज, मंडल कृषी अधिकारी प्रकाश पवार, वनरक्षक गिते, लायन्स क्लबच्या संचालिका शोभा फटांगडे, लोणी गावच्या सरपंच उर्मिला धुमाळ, माजी विद्यार्थी प्रबोधिनीचे उदयसिंह वाळुंज, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश वाळुंज, पांडुरंग वाळुंज, भूगोल फाउंडेशनचे कर्नल तानाजी अरबुज, माजी सरपंच उद्धव लंके, डॉ.भास्कर भोसले, डॅा.रसिक काळे, डॉ.देशमुख, राष्टप्रेम युवक मंडळाचे सर्वच युवा कार्यकर्ते, दिलीप वाळुंज, अशोक आदक, तानाजी राजगुडे व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, गावातील सर्व वस्तीवरील विविध मंडळे, महिला बचत गट इतर संस्थांचे पदाधिकारी, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.