Pune Viral Video: बहीण कोरोनामुक्त होऊन परत आली, तरुणीने ‘असे’ केले स्वागत

Pune Viral Video: Sister was recovered from corona and returned, the young sister 'welcome' By dancing to the song सलोनीच्या घरातील सहापैकी पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. फक्त एकट्या सलोनीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

एमपीसी न्यूज- गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा चांगलाच प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे यातून बरे होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर त्या रुग्णाचे कुटुंबीय त्यांना ओवाळून, फुलांचा वर्षाव करुन घरात स्वागत केले जात असल्याचे दिसत आहे. परंतु, पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी कोरोनामुक्त झालेल्या बहिणीचं स्वागत करताना बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे. सलोनी सातपुते असे या तरुणीचं नाव आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात ती कुटुंबासह राहते.

सलोनीच्या घरातील सहापैकी पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. फक्त एकट्या सलोनीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. या कालावधीत घरातील सर्व सदस्य क्वारंटाईन असताना सलोनी एकटीच घरात होती.

परंतु, दहा दिवसानंतर कुटुंबातील सर्व सदस्य उपचारानंतर बरी होऊन घरी परतले. तेव्हा मात्र सलोनीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिने अशाप्रकारे डान्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सलोनीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सलोनीने डान्स करताना आपण मास्क घालायला विसरलो होतो. आपल्याकडून ती चूक झाली होती. परंतु, इतरांनी असे करु नये, प्रत्येकाने फिजिकल डिस्न्सिंगचे पालन करुन आपल्या घरातील पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन परतल्यानंतर त्याचं असेच स्वागत करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.