Chinchwad : विद्युत रोषणाईने क्रांतिवीर चापेकर समूहशिल्प उजाळले

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या (Chinchwad) वतीने उभारण्यात आलेल्या चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर समूहशिल्पास दिल्लीतील इंडिया गेटच्या धर्तीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे समूहशिल्प उजाळले असून चिंचवडच्या सौंदर्यांत भर पडली. राष्ट्रीय सणांदिवशी या शिल्पाला तिरंग्याची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. इतर दिवशी कलरफुल लाईटिंग असणार आहे.

वासुदेव चापेकरांचा जन्म 1880 मध्ये चिंचवडमध्ये एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवडगावात क्रांतिवीर चापेकर समूहशिल्प उभारले आहे. दामोदर चापेकर व बाळकृष्ण चापेकर यांचे 12 फूट उंचीचे उभे आणि वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांचे बसलेले सात फूट उंचीचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

या समूहशिल्पास दिल्लीतील इंडिया गेटच्या धर्तीवर विद्युत रोषणाई करण्याची मागणी तत्कालीन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केली होती. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करुन घेतली. त्यांनी सतत पाठपुरावा करुन विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करून घेतले. महापालिका प्रशासनाने चार दिवसांपासून विद्युत रोषणाई सुरु केली आहे. त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे.

Khadakwasala Dam Update: खडकवासला धरण 100 टक्के भरले, 11 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

महापालिकेचे कनिष्ठ सागर देवकाते (Chinchwad) म्हणाले, क्रांतिवीर चापेकर समूहशिल्पास दिल्लीतील इंडिया गेटच्या धर्तीवर ‘आरजीबी’त विद्युत रोषणाई केली आहे. आरजीबी म्हणजे रेड, ग्रीन, ब्ल्यू रंगाने समूहशिल्प उजाळले आहे. राष्ट्रीय सणांदिवशी म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे महाराष्ट्र दिन आणि क्रांतिदिनादिवशी तिरंग्यांची थीम केली जाणार आहे. तिरंग्याची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. इतरदिवशी कलरफुल लाईटिंग असणार आहे.  यामुळे समूहशिल्पाच्या सौंदर्यात भर पडली आहे. चापेकर चौकातील पुलाखाली म्युरल्स उभारले आहेत. चौकाचे सुशोभीकरण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.