Chinchwad : पालखीत सहभागी वारकऱ्यांसाठी विश्व हिंदु परिषदेकडे औषध सुपूर्द

मधुकर बच्चे युवा मंच व सामाजिक सहकाऱ्यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – मधुकर बच्चे युवा मंच व काही सामाजिक सहकाऱ्यांच्या वतीने पालखीत सहभागी वारकऱ्यांसाठी वैद्यकीय व औषधे सेवा देणाऱ्या विश्व हिंदु परिषदेकडे काही औषधे सुपूर्द करण्यात आली.

संत ज्ञानेश्वर माऊली व संत जगद्गुरू तुकाराम महाराज पायी दिंडी / पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. मधुकर बच्चे युवा मंच व काही सामाजिक सहकाऱ्यांच्या वतीने पालखीत सहभागी वारकऱ्यांसाठी वैद्यकीय व औषधे सेवा देणाऱ्या विश्व हिंदु परिषदेकडे काही औषधे सुपूर्द करण्यात आली.
गेल्या १० पेक्षा अधिक वर्षांपासून राज्यमंत्री सचिन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही संस्था नामांकित डॉक्टर, नर्स (सिस्टर), अँम्बुलन्स व स्वयंसेवक आदींसह पूर्ण पालखी सोहळ्यास सेवा देत असतात. राज्यमंत्री सचिन पटवर्धन यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच गंधर्व हॉल येथे आयोजित कार्यक्रमास पालखी सोहळ्यासाठी औषधे विश्व हिंदू परिषद संस्था पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी नवनगर प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक सुरेश भोईर, भाजपा मंडल अध्यक्ष काळूराम बारणे, नगरसेवक विठ्ठल भोईर, नगरसेवक संदीप गाडे, सामाजीक कार्यकर्ते मुकुंद गुरव, भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, सतीश पवार, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, मिहीर नाडगौडा, जय वानखेडे, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिवंसरा, व्यावसायीक मारुती हाके, राजू कोरे, गोपाल कुलकर्णी, सौरभ शिंदे, गणेश बच्चे आदींनी औषधे स्वरूपात मदत केली. सदर कार्यक्रमात पालखी सोहळ्यात औषधे व वैद्यकीय सेवा विषयी चर्चा झाली. विश्व हिंदू परिषदचे यशवंत देशपांडे, विजय देशपांडे, परगोंडा पुजारी, बाळासाहेब मोकाशी, भास्कर गोडबोले, शेखर राऊत, विठ्ठल जाधव आदी पदाधिकारी औषधे स्वीकारण्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी प्रास्ताविक केले. तर, सौरभ शिंदे यांनी सर्व औषधरूपी सेवा देणारे व उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.