Dighi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. ही घटना 28 एप्रिल ते 22 जून 2019 या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण, शिवतेज नगर, स्पाईन रोड, रोहित वडेवाले, मिडास टच लॉज, आळंदी मोशी रोड डुडुळगाव या ठिकाणी घडली.

मालेश्वर कावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी 20 वर्षीय तरुणीने दिघे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेश्वर याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. यातून त्याने तरुणीला आकुर्डी प्राधिकरण, शिवतेज नगर, स्पाईन रोड, रोहित वडेवाले, मिडास टच लॉज, आळंदी मोशी रोड डुडुळगाव या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केला. याचे तरुणाने व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.