Chinchwad : रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभा असलेल्या व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावला. मोबाईल हिसकावणा-या एका चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी सव्वा एकच्या सुमारास काळभोरनगर, चिंचवड येथे घडली.

अभिजित सोमनाथ दौंड (वय 18, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार गणेश जाधव (वय 22, रा. आकुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पांडुरंग साहेबराव जाधव (वय 42, रा. पूर्णा नगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास फिर्यादी जाधव काळभोर नगर येथील गुडविल गोल्ड कंपनीसमोर रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवरून दोन चोरटे आले. त्यांनी जाधव यांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल फोन हिसकावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी अभिजित याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.