Chinchwad : भजन स्पर्धेत नारायणी भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कै. सोपानराव भोईर पुण्यस्मरणार्थ महिला भजन स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – कै. सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या 14 व्या पुण्यस्मरणार्थ महिला भजन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच चिंचवड येथील भोईरनगर येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जयवंत प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पंचपदीने केली. या स्पर्धेमध्ये एकूण २८ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

भजन स्पर्धेमध्ये चिंचवड भोइरनगर येथील नारायणी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला (स्मृतीचिन्ह आणि रोख रुपये 2501). इंदिरानगर येथील संतोषी मा भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक (स्मृतीचिन्ह आणि रोख रुपये 1501) व सरस्वती भजनी मंडळाने तृतीय क्रमांक (स्मृतीचिन्ह आणि रोख रुपये 1001) प्राप्त केला.

  • भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थांने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. तसेच वैशाली केसकर यांना हार्मोनियम वादक तर अपर्णा दिवेकर (महिला) व तुषार घाडे यांना तबला वादक हि वैयक्तिक बक्षिसे (रोख रुपये 501) देण्यात आली. परीक्षक म्हणून धोंडीराम सायकर व प्रदीप भडगावकर यांनी काम पहिले बक्षीस वितरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा आणि संकृतीक समिती सभापती तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे,नगरसेवक सुरेश भोईर,बाबू नायर, मा.नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, विनोद मालू, रमेश कोरे, संतोष पाटील,शिवाजी माने, सहदेव भोईर, दिलीप चव्हाण,मुकुंद काळभोर,हरीश शेट्टी,सचिन सावंत,नितीन शिंदे,संतोष शिंदे, जयराज काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी तर, सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. आभार नगरसेवक सुरेश भोईर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.