Chinchwad News: बलिदानदिनानिमित्त ‘निमा’तर्फे आयोजित शिबिरात 41 दात्यांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – हुतात्मा भगतसिंग ,सुखदेव, राजगुरू यांच्या ९० व्या बलिदान दिनानिमित्त नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) वतीने देशव्यापी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये 41 जणांनी रक्तदान केले. 27 जणांनी पुढील महिन्यामध्ये रक्तदान करण्यासाठी नावनोंदणी केली.

लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. पिंपरी- चिंचवड ब्लड बँक आणि ब्लड बँकेचे व्यवस्थापक मकरंद शहापूरकर यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

रक्त हे कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. यासाठी रक्तदान हेच पवित्र दान आहे. याद्वारे आपण एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. कोरोनामुळे सर्वत्र प्लाझ्मा व रक्ताची कमतरता जाणवत आहे.

त्या अनुषंगाने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा) ,नॅशनल इंटिग्रेटेड फोरम आँफ आर्टिस्ट एन अँक्टिविस्ट, इंडियन रेड क्रॉस सोसायटी , इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँन्ड इम्युनो हिमॅटॉलॉजी, ब्रह्मकुमारीज, नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल अशा विविध सेवाभावि संस्थांच्या मदतीने 23 मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन देशभरात केले होते.

निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले की, देश पारतंत्र्यात असताना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी बलिदान देऊन क्रांतीची मशाल पेटविली. तसेच कोरोनारुपी महासंकट आज आपल्या देशावर व जगावर पसरलेले आहे. यामध्ये प्रत्येक देश बांधवाचे कर्तव्य आहे की रक्तदान देऊन एकतरी जीव आपल्या हातून वाचावा. हे पूण्यकर्म करावे. तसेच हीच 90 व्या बलिदानदिनी या हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल”.

या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या शिबिरार्थींना टोकन ऑफ अ अँप्रिसिएशन म्हणून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. त्या प्रशस्ती पत्रकावर नामवंत खेळाडू ,कीर्तिवंत गायक ,सिनेतारका ,हुतात्मा भगतसिंग , सुखदेव, राजगुरू यांचे वंशज यांच्या स्वाक्षऱ्या असणारे प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

निमाचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, सचिव डॉ. अभय तांबिले, डॉ. सुनील पाटील, स्टेट निमाचे महासचिव डॉ. दत्तात्रय कोकाटे, सेंट्रलचे पदाधिकारी डॉ. नंदकुमार माळशिरसकर यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना “ऑपरिसिएशन सर्टिफिकेट “देऊन गौरवण्यात आले.

डॉ. मयूरी मोरे, डॉ जबीन पठाण   यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.