Chinchwad News: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 73 जणांवर खटले

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांवर कारवाई करणे, सामाजिक अंतर तसेच गर्दी करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार करणा-यांवर कारवाई केली जात आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 73 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 5) कारवाई केली आहे. संबंधित नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल करण्यात आले आहेत.

टाळेबंदीच्या आदेशाच्या नियमांमधून टप्प्याटप्प्यात शिथिलता देण्यात येत आहे. त्यांमुळे शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. गुरुवार (दि. 3) पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. अनेक दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.

ही शिथिलता देत असतानाच काही नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांवर कारवाई करणे, सामाजिक अंतर तसेच गर्दी करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार करणा-यांवर कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांची आकडेवाडी हजारोंच्या संख्येने दिवसेंदिवस वाढत आहे.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (16), भोसरी (0), पिंपरी (1), चिंचवड (7), निगडी (10), आळंदी (3), चाकण (0), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (8), हिंजवडी (10), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (16), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.