Chinchwad  News : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सहभागी व्हा; अमित गोरखे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पदवीधरांना केले.

पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत आज (रविवारी, दि. 1) पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध ठिकाणी पदवीधर नोंदणीसाठी अभियान राबविले. या अभियानाला भाजप अध्यक्ष महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर तुषार हिंगे, नगरसेवक केशव घोळवे, भाजप सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका योगिता नागरगोजे उपस्थित होते.

नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी या नोंदणी अभियानाचे नियोजन केले. अमित गोरखे म्हणाले, “पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही प्रत्येक पदवीधरांची हक्काची निवडणूक असते या निवडणुकीद्वारे पदवीधर मतदार पदवीधर आमदार महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्यासाठी निवडून देत असतात, त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून या अभियानात सहभागी व्हावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.