Chinchwad News : लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकांची शक्यता – अजित पवार

एमपीसी न्यूज – पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन 1999 मध्ये सहा महिने ( Chinchwad News ) बाकी असताना लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या होत्या. त्याचधर्तीवर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवारा नाना काटे यांच्या प्रचाराची सांगता आज (शुक्रवारी) झाली. चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलतो होते.  आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, प्रकाश गजभिये, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, योगेश बहल उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, शिवसेनेचे नाव, चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण, सर्वसामान्य जनतेला हा निर्णय मंजूर नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असे असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय तडकाफडकी का दिला याचा विचार करण्याची गरज आहे.

 

ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नाही. तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितीची, लोकशाहीच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे जनतेने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जनता याबाबत निर्णय घेईल. मुस्कटदाबीला राज्यातील जनता चोख उत्तर देईल. विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ( Chinchwad News ) महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. याही निवडणुकीकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.

 

Talegaon News : श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन 

 

महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या. परंतु, कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड-शोच्या निमित्तने फिरत नव्हते. पण, या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फिरले हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण मांडून आहेत. काही मंत्री गुंडांना घेवून फिरत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला. मोक्कामध्ये आत राहून आलेल्यांनी भोसले यांच्यावर हल्ला केला. मोक्यातील आरोपी बाहेर कसे आले, कोणी त्यांना बाहेर सोडले.

पोलीस खात्याला कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे समजत नाही का, निवडणुकीच्या काळात दहशत माजवू नये यासाठी पोलिसांनी ज्यांचे रेकॉर्ड खराब असते त्यांना नोटीसा का दिल्या नाहीत. भ्याड हल्ले महाराष्ट्रात कधी पाहिले नव्हते. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. एक आणि दोन नंबरचे नेते आमच्या लोकांना फोन करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

चिंचवडमध्ये पाणी, गृहनिर्माण सोसायट्यांचे विविध प्रश्न आहेत. सरकार असताना प्रश्न सोडवित नाहीत. निवडणूक आल्यानंतर केवळ आश्वासने दिली जातात. निवडणूक एकतर्फी असून बिनविरोध द्या असे भाजपवाले म्हणत होते. परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी ठाण मांडले आहे. यावरुनच निवडणूक एकतर्फी राहिली नसून चुरशीची झाल्याचे स्पष्ट दिसते. राहिलेल्या दोन दिवसात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तेवढेच कष्ट घेतले. तर, कसबा, चिंचवडमध्ये आम्हाला यश मिळेल, असा मला विश्वास आहे, असेही पवार ( Chinchwad News ) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.