Chinchwad News : रागा पॅलेस येथे आता बँक्वेट हॉलसह दिमाखदार रेस्टॉरंट सुद्धा!

एमपीसी न्यूज – नागरिकांची मागणी व त्याला मिळणारा (Chinchwad News) प्रतिसाद यामुळे रागा पॅलेस यांनी येथे केवळ बॅन्क्वेट हॉल नाही तर एक दिमाखदार रेस्टॉरंट देखील उभारले आहे. त्यामुळे शाही वातावरणात लग्न अनुभवणारे ग्राहक आता आपल्या कुटुंबीयांसह त्यांना हव तेंव्हा शाही स्टाईलमध्ये जेवणाचा आनंद देखील घेऊ शकतात.

 

एम्पायर इस्टेट ब्रीज जवळ असलेल्या रागा पॅलेसच्या आवारातच हे रेस्टॉरंट उभारलेले आहे. जिथे 150 जण एकाच वेळी जेवणांचा आनंद घेऊ शकतात. अगदी इंडियन ते कॉन्टीनेंटल अशा सर्व पदार्थांचा आस्वाद तुम्ही येथे घेऊ शकता. इथे बैठक व्यवस्था ही एसी व नॉन एसी अशी उपलब्ध आहे. रागा पॅलेस रेस्टॉरंटची खासीयत सांगायची झाली तर इथे नॉनव्हेज डिशेस आहेत ज्या पारंपारीक भारतीय व कॉन्टीनेंटल अशा स्वरुपात तुम्हाला पहायला मिळतील. या बरोबरच मॉकटेलचे तुम्हाला 10 ते 12 प्रकार टेस्ट करायला मिळतील, हलका मामला मध्ये विविध प्रकारचे रोस्टेड व फ्राईड पापड, लहान मुलांसाठी ज्युनिअर स्पेशल, सी फूड आणि बरच काही चाखता येणार आहे.

 

लोकेशन शहराच्या मध्यवर्ती असून पार्कींग सुविधा देखील प्रशस्त आहे. केवळ वरवरचा दिखाऊपणा नाही, तर हे सर्व करत असताना स्वच्छता व निटनिटकेपणा ठेवणारा स्टाफ. कार्यक्रमासाठी आलेल्यांना नम्र (Chinchwad News) वागणूक. कार्यक्रमासाठी आलेल्या पै-पाहुणे असो की मिटींगसाठी आलेले कंपनीचे अधिकारी यांच्या वाहनतळासाठी तब्बल शंभर ते दिडशे गाड्या मावतील, एवढे मोठे व स्वच्छ पार्कींग. रागा पॅलेस हे सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा या कालावधीत ग्राहकांसाठी खुले असणार आहे. तर विचार कसला करताय, तुमच्या आनंदाच्या क्षणांना रागा पॅलेससह साजरे करा आणि अविस्मरणीय आठवणी सोबत घेऊन जा.

पत्ता- रागा पॅलेस,काळेवाडी,एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाजवळ, काळेवाडी बीआरटीएस रोड

संपर्क – 8806577799

Pune : पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांना केली अटक; 11.5 लाख रुपयांचा माल जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.