Chinchwad News : पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्या वतीने एचआयव्हीबाधीत मुलांना अन्नदान

एमपीसी न्यूज- एचआयव्हीबाधित शंभरहून अधिक मुलांना सकस आहार पुरवण्याचे काम पुण्यातील ‘होप’ फाऊंडेशन करते. मुलांना या महिन्याचा सकस आहार चिंचवडगाव पोलीस चौकीचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्या वतीने देण्यात आला.

एचआयव्ही बाधित बालकांना होप फाऊंडेशन मदत करते. पुणे, पिंपरी चिंचवड, गडहिंग्लज, कोल्हापूर, इचलकरंजी व बारामती येथील एचआयव्ही बाधित बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

कार्यक्रमाचे आयोजन होप फाऊंडेशनचे पुणे विभाग प्रमुख विनायक खोत यांनी केले. आशा घोडके यांनी प्रास्ताविक तर, अनिल सुतार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला होप फाऊंडेशनचे शिवाजी देसाई, अभिजित आजगेकर व पोलीस चौकीचे योगदान लाभले.

यावेळी उपस्थित पोलीस हवालदार जगताप व पोलीस नाईक डामसे यांनी होप फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.