Chinchwad News : भंगाराचे कमिशन मागण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – भंगाराचे कमिशन मागण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण करून, जीवे मारण्याचीही दिली धमकी दिली. चिंचवड येथील काळभोर नगर येथे गुरूवारी (दि.07) सायंकाळी 5.00 ही घटना घडली.

प्रेम महादेव जगताप (वय 28, रा. आनंदनगर, बिगबाजार, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोहित दिवार, इब्बू शेख, शहाबाद शेख (रा. चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा भाऊ व मित्रासोबत आरोपी यांच्याकडे भंगाराचे कमिशन मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी तिघांना माराहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.