Chinchwad : कै. शंकरलाल मुथा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयात (Chinchwad) श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस कै. शंकरलाल उर्फ भाऊ जोगिदास मुथा यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी फत्तेचंद एज्युकेशन न्यूज बुलेटिन या युट्युब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले.

श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अ‍ॅड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा, सहसचिव व शाळा समिती चेअरमन अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या प्राचार्या सुनिता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, राजेंद्र पितळीया, पर्यवेक्षक संजीव वाखारे, मनीषा कलशेट्टी, एन आर चव्हाण, एस आर चोरडिया यांनी भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नवकार महामंत्र व ओम नमः शिवाय जाप करून अभिवादन केले.

यूट्यूब चॅनल तसेच नेहरू सायन्स सेंटरच्या वतीने भ्रमणशील विज्ञान वाहिनीचे उद्घाटन श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी सेक्रेटरी ऍड राजेंद्रकुमार मुथा व सहसचिव प्रा अनिलकुमार कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नवले यांनी केले. विद्यालयाच्या शिक्षिका (Chinchwad) छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

स्व. शंकरलाल मुथा यांच्या आठवणींना उजाळा देणारे त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन, सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती देणारा व्हिडिओ, कार्टून चित्र रेखाटन स्पर्धा, सुविचार पट्ट्या तयार करणे, फुले व भेटकार्ड तयार करणे, प्राणी पक्षी रेखाटन करणे, औषधी वनस्पतींचा ऑक्सिजन पार्क, विद्यार्थ्यांचे आरोग्य व हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.