Chinchwad : शहरातील आणखी 76 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 76 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 20) कारवाई केली आहे. 

पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये देखील शिथीलता आणली आहे. मात्र, सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना संचारबंदीचे नियम लागू आहेत. प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 76 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.

 पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे भोसरी एमआयडीसी (4), भोसरी (3), पिंपरी (4), चिंचवड (2), निगडी (15), आळंदी (0), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (9), वाकड (3), हिंजवडी (13), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (13), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0) अशी एकूण 76 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.