Pimpri :  चिंचवड स्टेशन, दिघीतील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; 152जण कोरोनामुक्त

कोरोना बाधितांचा आकडा पोहचला 252 वर; कोरोनामुळे 16 जणांचा आजपर्यंत मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीने अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. चिंचवड स्टेशन, दिघातील आणखी सात जणांचे  रिपोर्ट आज (गुरुवारी) पॉझिटीव्ह आले.  तर, सकाळीच पिंपळेसौदागर,  दिघी,  वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे आणि मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचे असे सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज आत्तापर्यंत 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट दुपारी आले आहेत.

त्यामध्ये चिंचवड स्टेशन, दिघातील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 23, 45 वर्षीय पुरुष आणि 12, 27, 32, 32, 31 वर्षीय पाच महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिका रुग्णालयात 87 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील 252 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 152 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर, शहरातील 16 बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या नऊ अशा 16 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.