Chinchwad : आयुक्तालयाच्या स्वतंत्र इमारतीमुळे पोलिसांच्या कामात सुसूत्रता येईल – आयुक्त आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली आहे. यासाठी महापालिका आणि पदाधिकाऱ्यांनी पुरेसा निधी आणि वेळ देऊन मोठी मदत केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजात सुसूत्रता येईल असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

शहरासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क चिंचवड येथे स्वतंत्र इमारत महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या इमारतीचे मागील सहा महिन्यांपासून डागडुजीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यावर एक जानेवारीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कारभार या इमारतीमधून सुरू करण्यात आला असून, आज (शुक्रवारी) चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्त बोलत होते.

कार्यक्रमात महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, उपमहापौर सचिन चिंचवडे, गटनेते राहुल कलाटे, सचिन चिंचवडे, कैलास बारणे आदींसह नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख अतिरिक्त महासंचालक संजीवकुमार सिंघल, वायरलेस विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकॅडमीचे प्रमुख विशेष महानिरीक्षक आर. डी. शिंदे, सीआयडीचे विशेष महानिरीक्षक सुनील रामानंद, पुणे शहर सहआयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील, सुनील फुलारी, जय जाधव, उपायुक्त सुहास बावचे, स्वप्ना गोरे, अशोक मोराळे, शिरीष सरदेशपांडे, पुणे ग्रामीण जिल्हा प्रमुख संदीप पाटील, शेषराव सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार निधीमधून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी 100 संगणक शुक्रवारी पोलीस दलाला मिळाले. त्याचे इन्स्टॉलेशन येत्या काळात होणार आहे. दरम्यान पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाकडून देण्याचे निश्चित करण्यात आलेली वाहने आणि मनुष्यबळ अद्याप पिंपरी-चिंचवडला मिळालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत.

आयुक्त पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, चंद्रकांत अलसटवार, अश्विनी केदार, गणपत माडगूळकर, निलम जाधव, राम जाधव, श्रीधर जाधव आदींनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.