Chinchwad : एल्प्रो मॉलमध्ये साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती; पाहण्यासाठी लोकांची गर्दी; 11001 दिव्यांचा दीपोत्सव

एमपीसी न्यूज – देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम  यांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा (Chinchwad)मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून याठिकाणी मंदिर पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना दिनाच्या पूर्वसंध्येला 11001 दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

मॉलमध्ये 21 जानेवारीला अयोध्येतील रामलला जन्मभूमीला अभिवादन(Chinchwad) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

WhatsApp Fraud : व्हॉट्स ॲपवरून येणाऱ्या अनोळखी कॉल, मेसेज बाबत सावधगिरी बाळगा

पुणे – पिंपरी-चिंचवड परिसरात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे प्रमुख केंद्र असलेल्या एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये आध्यात्मिकतेने ओतप्रोत असणारा हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला.

एल्प्रो मधील ही भव्य वास्तू केवळ स्थापत्यशास्त्राचा चमत्कारच नाही, तर भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आध्यात्मिकतेचे प्रतीक देखील असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती येथे असणार आहे. तसेच राम मंदिराच्या प्रतिकृतीचा हा संपूर्ण परिसर 11001 दिव्यांनी उजळून निघाला आहे.


हे दिवे जय श्रीराम या शब्दाची रचना असलेल्या आकारात असणार रचण्यात आले होते. हा देखावा या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यामुळेच संपूर्ण परिसर एका अनोख्या आध्यात्मिकतेच्या वातावारणाने भारावून टाकणार आहे.

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल आणि एल्प्रो फर्स्ट स्टेमधील सुमारे 300 मुलांनी यानिमित्ताने हनुमान चालिसा, रामरक्षा स्तोत्र यांचे सुसंवादी गायन केले आहे, तसेच मनमोहक पद्धतीने रामायणाची कथाही प्रस्तुत केली आहे. यामाध्यमातून भारतीय संस्कृती व आध्यात्माचे अनोखे दर्शन येथे उपस्थित असलेल्यांना होणार झाले.

चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये साकारलेल्या अयोध्या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी व दीपोत्सव साजरा करण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. यापुढेही ही  प्रतिकृती लोकांना मॉलमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.


या उपक्रमाला जास्तीत जास्त रामभक्त नागरिकांनी उपस्थित रहावे व भक्तीच्या या आगळ्यावेगळ्या मेळ्यामध्ये स्वतःला सामावून
टाकावे, असे आवाहन एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलविषयी :

एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल हे सर्व नागरिकांना जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील एक सर्वोत्तम ठिकाण आहे. केवळ वस्तूंची खरेदी-विक्रीच या ठिकाणी होते असे नाही, तर हे एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र देखील आहे. आपली समृद्ध संस्कृती जपण्यासाठी आणि तिचे सर्वांगाने संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने प्रयत्न होत असतात. पिंपरी-चिंचवड शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या या मॉलमध्ये विविध उत्सवांची नेहमीच रेलचेल असते.

 

या माध्यमातून समाजातील सांस्कृतिक वीण आणखी घट्ट करून समाजाता एकोपा वाढवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न येथे केला जातो. आपल्या आध्यात्मिकतेची व सांस्कृतिकतेची प्रतिमा आणखी स्पष्ट व पारदर्शी बनवणाऱ्या समारोहात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. असे मॉल व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.