Chinchwad : चित्रपट बंद पडल्याने प्रेक्षकांचा चित्रपटगृहात गोंधळ

एमपीसी न्यूज – तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटाचा खेळ बंद पडल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. ही घटना चिंचवड स्टेशन येथील कार्निवल चित्रपटगृहात रविवारी (दि. 16) सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्निवल चित्रपटगृहामध्ये माऊली या चित्रपटाचा खेळ सुरू होता. तांत्रिक बिघाडामुळे हा खेळ काही मिनिटातच बंद पडला. खेळ पुन्हा सुरू होत नसल्याने प्रेक्षकांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र चित्रपटगृहाच्या व्यवथापकांनी पैसे परत देण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर व्यवस्थापकांनी प्रेक्षकांना पैसे परत दिल्याने हा वाद निवळला. यावेळी कोणालाही मारहाण झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.