BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त

आणखी एकाला अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. ती दुचाकी देखील चोरीची असल्याचे उघड झाले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींच्या एका मित्राला एकाला अटक करत त्याच्याकडून देखील एक चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

अमोल विक्रम मोरे (वय 20, रा. गणेशनगर, येरवडा), समाधान त्रिंबक दौंड (वय 23, रा. गणेशनगर, येरवडा), संदीप राजेंद्र मोरे (वय 28, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणात समाधान दौंड याचा मित्र हनुमंत रामचंद्र राऊत (वय 21, रा. हडपसर) याला देखील अटक करण्यात आली आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी चाकण शिक्रापूर रोडवर फिनोलेक्स पाईपने भरलेला एक टेम्पो तीन चोरट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाईपने भरलेला टेम्पो जप्त केला. त्यानंतर आरोपी अटकेत असताना त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी ही चोरी करताना वापरलेली दुचाकी जप्त केली. ती दुचाकी देखील चोरीची असून त्यावर खोटा नंबर टाकून ती दुचाकी आरोपी वापरत असल्याचे उघड झाले. या दुचाकीबाबत मागील वर्षी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी समाधान दौंड याचा मित्र हनुमंत राऊत याच्याकडून आणखी एक मोटारसायकल जप्त केली. या दुचाकीबाबत बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी हनुमंत सह चोरीची दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सचिन मोरे, सुनील चौधरी, प्रमोद केळकर यांच्या पथकाने केली.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3