Charholi : चऱ्होलीतील नागरिकांनी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर घेतला संगीतमय दिवाळी पहाटचा आनंद

एमपीसी न्यूज – चऱ्होली येथील (Charholi) तनिष ऑर्चिड फेज-2 सोसायटीमध्ये धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर प्रथमच संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.‌ आकाश (आबा) काळजे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात तनिष ओर्चड फेस 2 मधील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, लहान , तरुण सर्व नागरिक उपस्थित होते. तसेच माजी महापौर नितीन (आप्पा) काळजे व युवा नेतृत्व प्रदीप (आबा) तापकीर उपस्थित होते.

यावर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाने सर्व सोसायटी सभासदांचे लक्ष्य वेधून घेतले. फतेह इव्हेंट मॅनेजमेंट टीमने अतिशय मंत्रमुग्ध करणारी गाणी गात दिवाळी पहाटची सकाळ आनंदाने उजळून निघाली.

Pimpri : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

यावेळी शोधीशी मानवा, विठ्ठलं आवडी प्रेम भावे, देहाची तिजोरी, शिर्डीवाले साईबाबा, मेरा कर्मा तु मेरा धर्मा अशा गाण्यांनी (Charholi)  रसिक मंत्रमुग्ध झाले.

सोसायटी परिसरात प्रेरणा राणे व पूनम वाघ यांनी उत्तम व आकर्षक रांगोळी काढून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. सोसायटी उपक्रमात अंकुश पानसरे यांनी 10 फुट बाय 10 फूट आकाराचे आकाश कंदील बनविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.