Sangvi : टेरेस स्वच्छ करण्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – एका भावाने दुस-या भावाला टेरेस स्वच्छ करण्यासाठी सांगितले. या कारणावरून दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. टेरेस स्वच्छ करण्यासाठी सांगणा-या भावाचे डोके फोडले. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

राहुल पांडुरंग कांबळे (वय 43, रा. बुद्ध घोष हाऊसिंग सोसायटी, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यशवंत पांडुरंग कांबळे (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी राहुल यांनी यशवंत यांना टेरेस स्वच्छ करण्यासाठी सांगितले. याचा राग मनात धरून यशवंत याने राहुल यांना बेदम मारहाण केली. तसेच दगडाने डोक्यात मारले. यामध्ये राहुल यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.