Pune News : पुढील 2 दिवस पुण्यासह राज्यात शीत लहर 

एमपीसी न्यूज : मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. कमाल तापमानात घट दिसणार मात्र किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. पुढील 2 दिवस राज्यात शीत लहर कायम राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होऊ शकते. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो.

दरम्यान, सध्या राज्यभरात गारठा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून या भागातील तापमान 5 अंश सेल्सियसवर गेलं आहे. तर, तोरणमाळ परिसरात दव बिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. गोंदियात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे.

अशातच गोंदियात थंडीची लाट येणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अवघं वातावरण ढवळून काढले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.